Contact us

My Cart
Rs.0.00
My Cart
Rs.0.00
Blog

आता अळी- मिळी गुपचिळी नाही !

विटाळ’ ‘ती बाहेर बसली’ आहे हे शब्द आहेत अगदी २० वर्षांपूर्वी घराघरांमध्ये बायकांच्या कुजबुजण्यात ऐकू येणारे शब्द. कुजबुजले अशा करता जायचे कारण घरच्या पुरुषांनी जर ते ऐकले तर त्या बाईला मेल्यासारखं व्हायचं. खरं तर ‘पाळी येणं’ किंवा ‘पिरियड्स येणं’ हे फारच नैसर्गिक आहे पण त्याच्याभोवती परंपरांचा इतका विळखा इतका जबरदस्त होता की हे काहीतरी अमंगळ आहे अशी भावना व्हायची, ह्याच्यावर चार चौघांच्यात तर सोडा पण चार बायकांच्यात पण चर्चा नको असं वाटण्याचा तो काळ.

हा काळ आपल्यापैकी काहींनी ऐकला असेल किंवा काहींनी थोड्याफार प्रमाणात अनुभवला असेल. पण आपली आई, आजी, पणजी ह्यांच्या काळात काय मनस्ताप त्यांना सहन करावा लागला असेल ह्याची कल्पनाच न केलेली बरी. मुळात हे विटाळ त्यामुळे त्याच्याकडे जितकं दुर्लक्ष होईल तितकं उत्तम ही भावना घट्ट झालेली. बरं जो विचार मनाला त्रास देतो तो नाकारण्याकडे आपला इतका कल असतो की त्याच्या परिणामांचा विचार पण नकोसा होतो आणि मग ह्यातूनच पिढ्यानपिढ्या ह्या काळातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष झालं.

हे विधान जरा अतिशयोक्तीपूर्ण वाटेल पण खरंच सांगा ‘सॅनिटरी पॅड’ ह्यात फार काही रॉकेट सायन्स आहे का हो? नाही ना? वाफेच्या इंजिनापासून ते अगदी दुसऱ्या महायुद्धातल्या अणुबॉम्ब पर्यंत सगळे शोध लागत होते पण ‘सॅनिटरी पॅड’ सारखी अगदी साधी दिसणारी आणि असणारी वस्तू बनायला मात्र २० व्या शतकापर्यंत का थांबायला लागलं? आमच्या पूर्वजांनी ह्याचा शोध लावला त्याचा शोध लावला हे सांगणारे अनेक पुरावे सापडतात, शृंगारानी भरलेली भित्तिचित्रं सापडतात, जुन्या काळातील न्हाणीघरातील वस्तूंची चित्र सापडतात पण ‘सॅनिटरी पॅड’ किंवा आपण वापरतो ते पॅंटीलायनर सदृश काहीच का नाही सापडत? ह्याला कारण ना स्त्रियांनी ना समाजाने ह्या काळातील किंवा एकूणच स्त्रीच्या नाजूक भागाच्या स्वच्छतेकडे कधी लक्ष दिलं, उलट तिथे होणारे ४ दिवसातले किंवा इतर २६ दिवसातले स्त्राव आपल्याला दुर्लक्षित करायला शिकवले.

पण काळ बदलला आहे. आज बायकोसाठी सॅनिटरी नॅपकिन पॅड विकत घेणारा पुरुष सर्रास आढळतो, सॅनिटरी पॅड चोरून न मागता अगदी उघडपणे मागणाऱ्या स्त्रिया सर्वत्र आढळतात. इतकंच काय तर कॉलेजची मुलं, मुली ह्या चार दिवसांची चर्चा अगदी उघड करतात. कारण ते चार दिवस असोत की इतर २६ दिवस प्रश्न स्त्रावाचा नाही तर स्वच्छतेचा आहे हे मुळात लोकांना मान्य होऊ लागलंय.

ह्या बाबतीत २०१८ साल हे क्रांतिकारी वर्ष म्हणावं लागेल. सॅनिटरी नॅपकिनवर सरकारने जीएसटी लावला म्हणून देशभरात आंदोलनं झाली आणि पुरुषप्रधान मानसिकतेच्या देशात देखील पुरुष राजकारण्यांपासून ते सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्यांनी सरकारचा निषेध केला. आणि त्यावरचा जीएसटी मागे घेतला गेला. पॅडमॅन सारखा सिनेमा जो ह्या काळातल्या स्वच्छतेबद्दल बोलतो तो स्त्री पुरुषांनी एकत्र बसून थिएटर्स मध्ये, घरी बसून बघितला इतकी आपण ह्या स्वच्छतेलामान्यता द्यायला लागलो. नुकत्याच झालेल्या विधानसभांच्या निवडणुकात एका राजकीय पक्षाने तर मोफत सॅनिटरी नॅपकिन देऊ असं जाहीरनाम्यात म्हणलं. ते मोफत देवोत अथवा नाही, आपल्या नाजूक भागांची स्वच्छता महत्वाची आहे हे तरी मान्य झालं. शबरीमाला मंदिरात बायकांना प्रवेशासाठी  कुठलीही वयोमर्यादा नको असा “बोल्ड स्टेप” म्हणण्याजोगा  निर्णय जेव्हा सर्वोच्च नान्यालायाने जाहीर केला तेव्हा त्याचे अनेक चांगले- वाईट पडसाद उमटले . हा निर्णय कितपत मान्य केला जाईल ह्यात शंका आहे परंतु एक वेगळा विचार ह्या रूपाने मांडला गेला एवढं नक्की. अनेक सेवाभावी संस्था व सरकार  सॅनिटरी नॅपकिन सगळ्यांना परवडतील अश्या किमतीमध्ये उपलब्ध करण्याच्या प्रयत्नात आहेत. तसच हे नॅपकिन पर्यावरणासाठी धोकादायक ठरू नयेत ह्याचेही प्रयत्न अनेक ठिकाणी चालू आहेत. एकूणच पाळी हि नैसर्गिक क्रिया आहे आणि ती स्त्रीच्या आयुष्यातील एक अविभाज्य भाग आहे हि संकल्पना आता भारतात मान्य होत आहे.

रमा लाईफ सायन्सेसच्या निलोरी पॅंटीलायनर्सच्या विक्रीसाठी जेंव्हा आम्ही डिस्ट्रिब्युटर कडे जातो तेंव्हा बहुसंख्य डिस्ट्रिब्युटर पुरुष असतात, पण ते हे प्रॉडक्ट हाताळतात, अगदी दुकानदार पण छान प्रतिसाद देतात, कुठेही अवघडलेपण नसतं, काही जण आवर्जून सांगतात की त्या चार दिवसांव्यतिरिक्त  इतर दिवसांसाठी पॅंटीलायनर ची सोय हा खूप सुखद अनुभव आहे.

मैत्रिणींनो समाजाने आपल्या नाजूक भागांच्या स्वच्छतेला स्वीकारलं आहे, ह्यासाठी किती पिढ्यांनी भोगलं ह्याचा हिशेब नाही. पण आज ती वेळ आली आहे. लक्षात ठेवा, ते चार दिवस असोत की पुढचे २६ दिवस जर आपणच आपली स्वच्छता राखली तर का कसले आजार होतील? कुंकू, टिकली, परफ्यूम्स ह्या सारखंच थोडा खर्च आपल्या स्वच्छतेवर करूया की.

तुमचा फीडबॅक आवश्यक आहे त्यामुळे asknillorymedia@gmail.com ह्या इमेल वर आम्हाला लिहा आणि हो आमची वेबसाईट एकदा बघाच.

http://ramalifescience.com/

Close
Compare
Wishlist 0
Open Wishlist Page Continue Shopping