Contact us

My Cart
Rs.0.00
My Cart
Rs.0.00
Blog

व्हॅलेन्टाईन्स डे….जरा हटके!

१४ फेब्रुवारी, व्हॅलेन्टाईन्स डे, हा इंडिया राष्ट्रीय उत्सव झाला आहे. व्हॅलेन्टाईनच्या भोवती असेलला विरोध आता मावळला आहे.
व्हॅलेंटाईन हा फक्त कॉलेजला जाणाऱ्यामुलामुलींचा उत्सव राहिला नसून तो मध्यमवयीन जोडपी पण साजरी करू लागली आहेत.
लग्न झालेल्या दोन मैत्रिणी एकमेकींना अगदी सहज एक प्रश्न विचारतात,”मग व्हॅलेंटाईनगिफ्ट काय ह्यावेळेला?”…व्हॅलेन्टाईन्स हा जसा जसा जास्त स्वीकारला जातोय तसं तसं
त्याच्या भोवतीचा रोमँटिक ‘गुलाबी रंग’ हटू लागलाय आणि तो अधिक व्यवहार्य पातळीवर येऊ लागला आहे.

त्यामुळेह्या व्हॅलेंटाइन्सला ‘गिफ्ट’ पण जरा हटके असायला काय हरकत आहे.समजा ह्या व्हॅलेन्टाईन्सची थीम ‘हायजिन’ ठेवली तर.
मग ह्या ‘हायजेनिक व्हॅलेन्टाईन्स’ साठी काही गोष्टी नक्की करून बघुयात…

 • जुनं विसरून जा :- जे जे काही गेल्या काही महिन्यात तुमच्या मनात साठलं असेल, त्याला विसरून जा, जोडीदाराला क्षमा करा.
  मनातील जुनी जळमटं काढूनटाकणं हे हायजिनच नाही का? तुमच्या व्हॅलेन्टाईनला हे गिफ्ट नक्की आवडेल
 • सोशल हायजिन :- अनावधानाने पण रस्त्यात कचरा न टाकणं, न थुंकणं हा सोशल हायजिन तुम्हाला आणि तुमच्या व्हॅलेन्टाईन्सच्या भविष्यासाठी किती महत्वाचा ठरेल.
 • स्वतः हायजिन रहा आणि आदर्श ठेवा :- तुमची मुलं ही तुमची व्हॅलेंटाईन सेलिब्रेशनचा भाग का असू नयेत? आणि जर ती आहेत, त्यांना काही तरी गिफ्ट द्यायचंआहे तर स्वतः हायजिन रहा.
  दिवसातून दोनदा ब्रश तुम्ही केलंत, जेवणाच्या आधी हात धुतलेत, घामाच्या दुर्गंधी पासून मुक्ती देणारे स्वेट पॅड तुम्हीच वापरू लागलाततर तुमची मुलं पण ह्या सवयी नकळत उचलतील
 • स्वतःच्या हायजिनसाठी वेळ काढा :- तुम्हीच जर तुमच्या व्यक्तिगत स्वच्छतेसाठी वेळ काढलात तर तुमचा जोडीदार नक्की खुश राहील, आणि मग आपोआपव्हॅलेंटाईन उत्तम साजरा होईल
 • पर्सनल हायजिन साठी खर्च करायची मुभा द्या :- वायफळ खर्चासाठी मुलांना पैसे देण्याच्या ऐवजी, त्यांना त्यांच्या पॉकेट मनी मधून हायजिन प्रॉडक्ट साठी खर्चकरण्यासाठी पैसे द्या.
  समजा मुलगी असेल तर तिला उरलेले २६ दिवस पॅंटीलायनर्स वापरण्यासाठी पैसे द्या. कारण तिच्या उमलत्या वयात जर ती कुठल्याही इन्फेक्शनपासून दूर राहिली तर तिचंच आरोग्य छान राहील.
  जर मुलगा असेल तर त्याला ‘स्वेटपॅड्स’ स्पॉन्सर करा. शरीराला हानिकारक डिओड्रंट वापरण्या पेक्षा नैसर्गिकघटकांनी बनलेले ‘स्वेटपॅड्स’ कसे उत्तम हे त्यांना पटवून द्या
 • तुम्ही स्वतःच्या हायजिनवर खर्च करा :- सिर सलामत तो टोपी पचास’ असं म्हणतात. जर तुम्ही तुमच्या स्वछतेची नीट काळजी घेतलीत, तर तुम्ही निरोगी रहाल.
  हल्ली स्त्रिया कमावत्या झाल्या आहेत. पण तरीही पिरियड्सचे चार दिवसात त्या सॅनिटरी नॅपकिन वापरतात आणि तिथेच त्यांची वैयक्तिक स्वच्छतेच्या काळजीचीव्याख्या संपते.
  का असं? उरलेले २६ दिवस पण स्त्राव हा होतच असतो, भले त्याचं प्रमाण कमी असेल. मग त्याची काळजी घ्यायला नको?
  मग पॅंटीलायनर सारखंवरदान ठरू शकणाऱ्या प्रॉडक्टवर का नाही खर्च करायचा?
 • स्वतःवर प्रेम करायला शिका :- संपूर्ण सृष्टीमधला बुद्धिमान प्राणी म्हणजे मानव. ह्या मानव जातीत जन्माला येण्याचं भाग्य मिळालं आहे त्याचा नीट विचार करा आणि
  आपल्या शरीर व मनाची योग्य ती काळजी घ्या.
  जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करायला शिकाल तेव्हाच दुसऱ्यावर प्रेम करू शकाल.
 • हायजिन प्रॉडक्टस गिफ्ट करा :- कशाला हवेत महागडी आणि बिनकामाची गिफ्ट? जर पॅडमॅन मधला अक्षय कुमार बायकोला सॅनिटरी नॅपकिनचं गिफ्ट देऊशकतो तर
  तुम्ही का नाही बायकोला पॅंटीलायनरचं गिफ्ट देऊ शकत? आणि हो स्त्रियांनी पण नवऱ्याला डिओड्रंट गिफ्ट करायच्या ऐवजी मस्तपैकी ‘स्वेटपॅड्स गिफ्टकरून तर बघा
हा हायजिनिक व्हॅलेन्टाईन्स डे ३६५ दिवस साजरा करा, आणि बघा कसं आयुष्य बदलून जाईल ते.
Close
Compare
Wishlist 0
Open Wishlist Page Continue Shopping